Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
धर्माधिकारी प्रतिष्ठानचे दहा हजार स्वयंसेवक आज सांगली स्वच्छ करणार

16-Aug-2019 : सांगली / प्रतिनिधी

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान. रेवदंडा ता.अलिबाग, जि.रायगड यांच्या वतीने सांगली,कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त गावे व शहरांची स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे , अभियाना मध्ये सांगली जिल्हा ७० गावे व सांगली शहर व कोल्हापूर जिल्ह्यातून १९ गावे ३ नगरपालिका व कोल्हापूर शहर व सातारा जिल्ह्यातून ६ गावे स्वच्छ करण्यात येणार आहेत वरील सर्व गावे शहर व नगरपालिका दिनांक १७ ऑगष्ट २०१९ ते २१ऑगष्ट पर्यत राबवण्यात येणार आहे.या सर्व कामासाठी लागणारे मनुष्य बळ व वहातूक यंत्रणा व हँण्ड ग्लोवज व मास्क प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणार आहे.

ही स्वच्छता मोहिम ‘स्वच्छ भारत अभियानाचे’ महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भुषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.

सामाजिक बाधिलकी आणि समाजऋणांची जाणिव ठेऊन हे प्रतिष्ठान वृक्षारोपण व संवर्धन, स्वच्छता अभियाने, दुर्घटनाग्रस्तांना मदत, स्मशानभूमी नुतनीकरण, धरणातील,पुष्करणीतील,तलावातील, विहीरीतील, नदीतील गाळ काढणे, वनराई बंधारे बांधने, जल पुनर्भरण, निर्माल्य संकलन व निर्माल्यापासून खत निर्मिती प्रकल्प,गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter