16-Aug-2019 : कडेगाव/ प्रतिनिधी
पुरग्रस्तांना शासनाकडून दिली जात असणारी मदत दुप्पट करावी व पूरग्रस्त शेतकर्यांची त्वरित कर्जमाफी करावी, कायमस्वरुपी आराखडा करावा यासह इतर पुरग्रस्तांच्या मागण्यांसाठी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष आ.विश्वजीत कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
आ.विश्वजीत कदम यांनी शुक्रवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावर सविस्तर चर्चा देखील करण्यात आली. आ.कदम यांनी पलूस-कडेगाव मतदार संघातील पूरग्रस्त भागाच्या विदारक स्थितीबद्दलची छायाचित्रे व व्हिडीओ दाखवून पूरग्रस्तांची कैफियत मुख्यमंत्र्यांसमोर मांडली, तसेच प्रभावी मदत कार्याबद्दलचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. आ.कदम म्हणाले, सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे हजारो हेक्टर शेती पुराच्या पाण्यात गेली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यांना शासनाने तातडीने मदत करणे आवश्यक आहे. पूरग्रस्त शेतकर्यांची त्वरित कर्जमाफी करणे आवश्यक आहे. पूरग्रस्तांना शासन शहरी भागात पंधरा हजार रूपये तर ग्रामीण भागात दहा हजार रूपये मदत देत आहे.
|