Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
स्थायी समिती सदस्य निवडीसाठी जोरदार रस्सीखेच : आज निवडी

03-Sep-2019 : सांगली / प्रतिनिधी

महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ सदस्यांच्या निवडीसाठी बुधवारी विशेष महासभा होणार आहे. या सभेत भाजपच्या चार, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन सदस्यांच्या निवडी होणार आहेत. सदस्यांच्या निवडी साठी तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. सदस्यांचा फैसला बुधवारी महासभेत होणार आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवृत्ती दि. ३१ ऑगस्टला चिठ्ठी पध्दतीने झाली . त्यानुसार स्थायी समितीच्या सभेत आठ सदस्यांच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या होत्या. यात भाजपचे पांडुरंग कोरे, प्रकाश ढंग, स्वाती शिंदे, संजय कुलकर्णी, कॉंग्रेसचे संजय मेंढे, वर्षा निंबाळकर तर राष्ट्रवादीचे विष्णू माने व रझिया काझी स्थायीतून बाहेर पडले होते. त्यांच्या जागी नूतन आठ सदस्यांच्या निवडी होणार आहेत. ज्या प्रमाणात पक्षाचे सदस्य बाहेर पडले आहेत. त्याच प्रमाणात नूतन सदस्यांच्या निवडी केल्या जाणार आहेत.

भाजपच्या चार जागांसाठी अनेकजण इच्छूक आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter