Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
कृष्णा दीड तर वारणेच्या पाणी पातळीत चार फुटांनी वाढ

03-Sep-2019 : सांगली / प्रतिनिधी

कोयना, चांदोली धरण पाणलोटात पाऊस सुरु असल्यामुळे दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग मंगळवारी दुसर्‍या दिवशीही कायम होता. वारणा धरणातून ५हजार ५०० क्युसेकने तर कोयना धरणातून ६ हजार ७२८ क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. सांगलीत आयर्विनची २४ तासांत पाणी पातळी दीड फुटाने वाढून १०.६ फूट एवढी झाली. वारणा धरणातील पाणी पातळीतही चार फुटांनी वाढली आहे.

धरण क्षेत्रात पडणार्‍या पावसामुळे कोयनेतून सोमवारी दिवसभर २६ हजारने विसर्ग होता. सायंकाळी सहानंतर तो केवळ २१०० क्युसेकवर आणला होता.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter