Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणार्‍या वृध्दास सश्रम कारावास

03-Sep-2019 : सांगली / प्रतिनिधी

तिसरीत शिकणार्‍या अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीस अति.सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्वर यांनी १८ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. काका रामू पवार (वय ६५, रा.नरसेवाडी, ता. तासगाव, जि.सांगली) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या कामी सरकार पक्षातर्फे अति.सरकारी वकील सौ.आरती साटविलकर यांनी काम पहिले.

हा गुन्हा १६ ऑगस्ट २०१४ रोजी घडला होता. पिडित मुलगी तिसरीत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होती. मधल्या सुट्टीत ती तिच्या मैत्रिणीसोबत शाळेच्या आवारात खेळत होती. त्यावेळी आरोपीने त्या मुलीकडे जाऊन तिला २ रु.देऊन तिला खाऊ आणण्यासाठी म्हणून शाळेच्या समोर असलेल्या शेतात नेऊन तिला दारू पाजण्याचा प्रयत्न केला . ती मुलगी आरडा ओरड करू लागली.त्यावेळी शेतातील वस्तीवर राहणारी महिला आवाजाच्या दिशेने आपल्या मुलासोबत गेली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter