Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
पत्नीस जीवे मारण्याचा प्रयत्न : पतीस सक्तमजुरी

23-Sep-2019 : पत्नीस जीवे मारण्याचा प्रयत्न : पतीस सक्तमजुरी

सांगली / प्रतिनिधी

किरकोळ कारणावरून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या दिनकर नलवडे यास सत्र न्यायाधीश विजय पाटील यांनी ५ वर्षे सक्त मजुरी आणि ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. दिनकर मच्ंिछद्र नलवडे (वय २९, रा.नलवडे मळा, मतकुणकी, ता. तासगाव) असे त्याचे नाव आहे. सरकार पक्षातर्फे अति. सरकारी वकील आरती साटविलकर-देशपांडे यांनी काम पहिले.

सदरचा गुन्हा १३ जुलै २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नलवडे वस्ती, मतकुणकी येथे आरोपीच्या घरात घडला होता. यातील जखमी दीपाली हिचे २०१२ साली लग्न झाले होते.त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दिनकर हा शेतीचे काम करीत होता. मागील दीड वर्षापासून तो पत्नी दीपाली हिला कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्रास देत होता.या घटनेच्या एक वर्ष अगोदर दिनकरने दीपालीला कात्रीने मारले होते. दि.१३ जुलै २०१७ रोजी आरोपी हा शेतातील काम उरकून ५ वाजण्याच्या सुमारास घरी आला. त्यावेळी दीपाली खलबत्त्यात शेंगदाणे कुटत होती.दिनकरने तिच्याकडे पैसे मागितले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter