Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
स्वतंत्र बँक खाते निवडणूक खर्चासाठी उमेदवारांना सक्तीचे

23-Sep-2019 : सांगली / प्रतिनिधी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविणार्‍या इच्छुक उमेदवारांनी निवडणूक नामनिर्देशन दाखल करण्यापूर्वी किमान एक दिवस आधीपर्यंत निवडणूक खर्चाकरिता स्वतंत्र बँक खाते उघडणे सक्तीचे असल्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.

निवडणूक नामनिर्देशन दाखल करतेवेळी करण्यात येणारे आवेदन शुल्क, अनामत रक्कम, प्रतिज्ञापत्र व इतर अनुषंगिक बाबींवर येणारा खर्च निवडणूक कार्यासाठी उघडण्यात येणार्‍या स्वतंत्र बँक खात्यातून होणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या संदर्भातील सर्व व्यवहारदेखील याच बँक खात्यातून केले जाणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी निवडणूक कार्यासाठी त्यांच्या सोयीच्या राष्ट्रीयकृत बँक / शेड्यूल बँक / सहकारी बँक इत्यादी बँकेमध्ये नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यापूर्वीच किमान एक दिवस आगोदर पर्यंत खाते उघडून कार्यान्वित करून घ्यावे. याबाबत काही समस्या अथवा अडचणी असल्यास जिल्हा खर्च सनियंत्रण नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर यांच्याशी संपर्क साधावा.

निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते न उघडणे किंवा निवडणुकीचा खर्च निवडणुकीसाठीच्या स्वतंत्र बँक खात्यातून न करणे ही बाब नियमभंग करणारी आहे, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. चौधरी यांनी केले आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter