23-Sep-2019 : सांगली प प्रतिनिधी
जुलै-ऑगस्ट २०१९ मध्ये भीमा कृष्णा खोर्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीची कारणे शोधणे व उपाययोजना सुचविणे याकरिता शासनाने तज्ज्ञ समिती गठीत केली असून समितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने सोमवारी सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या. त्यांच्यासोबत जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे तांत्रिक सदस्य विजय कुलकर्णी, महाराष्ट्र सुदूर संवेदना उपयोगिता केंद्र नागपूरचे वि. म. घारे, पुरंदरे, जलसंपदा विभागाचे सचिव (लाभ क्षेत्र विकास) राजेंद्र पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
समितीने दौर्यामध्ये जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठची पाहणी, पूरबाधित क्षेत्राची पाहणी, शहरी भागातील, महानगरपालिका बाधित क्षेत्राची पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीवेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगर पालिका आयुक्त नितीन कापडणीस, मुख्य अभियंता जलसंधारण पुणे विलास राऊत, धरण संकल्पिय मंडळ नाशिकचे अधिक्षक अभियंता अभय पाठक
|