24-Sep-2019 : सांगली / प्रतिनिधी
मागील आठ दिवस पावसाने उसंत घेतल्यानंतर सोमवारी मध्यरात्री पावसाचे पुनरागमन झाले. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सांगलीसह जिल्ह्याच्या पश्चिम भागाला पावसाने झोडपून काढले. या पावसाचा फायदा येणार्या रब्बी हंगामाला होणार आहे. दरम्यान धरण क्षेत्रातील पावसाचा अंदाज घेऊन कोयना धरणातून २१ हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आले.
जिल्ह्यात सोमवारी दिवसभर कडाक्याचा उकाडा अनुभवायास मिळाला, त्यानंतर मध्यरात्री सोसाट्याच्या वार्यासह पावसाला सुरुवात झाली. सकाळपर्यंत जिल्ह्यात १५.८० मिलीमिटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावली , तर दुष्काळी जत आणि खानापूर तालुक्यातही १९ मि.मी पर्यंत पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान पावसामुळे सांगली शहरातील उपनगरांमध्ये चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळाले, त्यामुळे त्या भागात काही काळ जनजीवन विस्कळीत राहिले. जिल्ह्यात नदी काठावरील गावांमध्ये महापुरामुळे खरीप वाया गेला , तर दुष्काळी तालुक्यांमध्ये पाण्याअभावी गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने हजेरी लावली नव्हती , त्यानंतर आलेल्या पावसाने आता रब्बी हंगामातील पेरणीला तरी चांगली सुरूवात होईल,
|