Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
तडीपार आदेशाचा भंग केलेले दोन सराईत गुन्हेगार जेरबंद

24-Sep-2019 : सांगली / प्रतिनिधी

तडीपारी आदेशाचा भंग करुन कोणत्याही अधिकार्‍याची पूर्वपरवानगी न घेता शहरात दाखल झालेल्या दोघा तडीपार गुंडांना एलसीबीने ताब्यात घेतले आहे. बंड्या दडगे आणि महेश पाटील अशी त्यांची नावे आहेत.

आगामी विधानसभा निवडणु कीच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आणि अपर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले यांनी तडीपारी आदेशाचा भंग करुन शहरात आलेल्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने तडीपारी आदेशाचा भंग केलेल्यांचा शोध सुरु केला आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केलेला गुन्हेगार बंड्या आप्पासाहेब दडगे (वय ४०, रा.पाटील गल्ली, गावभाग, सांगली) हा तडीपारी आदेशाचा भंग करुन हॉटेल शिवनेरीजवळ वावरत होता. त्याला ताब्यात घेवून सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले .

दुसर्‍या घटनेत सांगली जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार केलेला महेश आनंदराव पाटील (वय २८, रा. सांगलीवाडी) हा तडीपारी आदेशाचा भंग करुन इस्लामपूर रोडवरील एस्सार पेट्रोलपंपाजवळ वावरत असताना आढळला. त्याला ताब्यात घेतले आहे.

सदरच्या दोन्ही कारवाया पो.नि.श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण शिंदे, अंतम खाडे, शरद माळी यांच्यासह अमित परिट, निलेश कदम, अरुण औताडे, शशिकांत जाधव, उदय माळी, आर्यन देशिंगकर, सुहेल कार्तीयानी, राजू मुळे, मच्छिंद्र बर्डे, संजय पाटील, जितेंद्र जाधव, मुदस्सर पाथरवट, सचिन कनप, हणमंत शिरतोडे यांनी केली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter