Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
गोपीचंद पडळकर पुन्हा भाजपमध्ये परतणार?

24-Sep-2019 : सांगली / प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी अखेर वंचितला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांत त्यांची घरवापसी होणार असल्याची शक्यता वर्तविली जात असून ते जत विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याची शक्यता आहे.

खासदार संजयकाका पाटील व गोपीचंद पडळकर यांच्यात वैर निर्माण झाल्याने पडळकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने प्रवेश केला व थेट खासदार संजयकाका पाटील यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. त्यांच्या उमेदवारीमुळे लोकसभेच्या निवडणुकीला रंगत आली होती. या निवडणुकीत संजयकाका पाटील विजयी झाले असले तरी पडळकर यांनी सुमारे तीन लाख मते मिळविली होती. त्यानंतर पडळकर यांनी वंचितचे काम सुरू केले होते. पक्षाने त्यांना महासचिवपदाची जबाब दारी देखील दिली होती. मात्र त्यांनी आता वंचित बहुजन आघाडी सोड ण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित आघाडीच्या मोठ्या कार्यक्रमांनादेखील त्यांची गैरहजेरी असते.

विधानसभेच्या निवडणुकीत ते खानापूर-आटपाडी किंवा सांगोला विधानसभा मतदारसंघातून लढतील, अशी चर्चा होती.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter