Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
मोठ्या भावाचा खून करणार्‍यास अटक

24-Sep-2019 : कडेगाव / प्रतिनिधी

अंबक फाटा सोनहीरा कारखाना चौक येथील बुरुंगले कुटुंबात जागेच्या वाटणीतून तसेच घरगुती वादातून नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून करणार्‍या सख्या भावास व त्याच्या साथीदारास चिंचणी (वांगी) पोलिसांनी अटक केली आहे. खून केल्यानंतर आरोपींनी अपघाताचा बनाव रचला होता. हा प्रकार शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर रोजी रामापूर फाट्याजवळ रात्री बाराच्या सुमारास घडला होता. शिवाजी सिदा बुरुंगले (वय ५०, रा. अंबक फाटा, तालुका कडेगाव मूळ गाव - जुनोनी ता.सांगोला , जिल्हा सोलापूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

या प्रकरणी मयत शिवाजी याचा भाऊ शंकर सिदा बुरुंगले (वय २४ , रा. अंबक फाटा, ता. कडेगाव), काशीलिंग लालासो मोहिते (वय २५, रा. वांगी , ता. कडेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, २० सप्टेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास शिवाजी बुरुंगले हा कडेगाव वरून अंबक फाटाकडे दुचाकीवरून येत होता . यावेळी कडेगाव - तडसर रस्त्याला विक्रमनगरजवळ शिवाजी हा आला असता पाठीमागून दुचाकीवरून पाठलाग करत आलेला त्याचा भाऊ शंकर याने लोखंडी रॉड शिवाजी याच्या डोक्यात घालून मारहाण केली व तो पळून गेला .यानंतर काही वेळाने जखमी अवस्थेत पडलेल्या शिवाजी यास रस्त्याने चाललेल्या काही लोकांनी कडेगाव येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले .

यानंतर शंकर याने पुन्हा कडेगाव येथील खासगी रुग्णालयात येऊन अपघाताचा बनाव करून शिवाजी यास पुढील उपचारासाठी सांगलीला नेणार असल्याचे सांगितले डॉक्टरांना सांगितले. यानंतर शंकर हा शिवाजी यास त्याच्या अंबक फाटा येथील घरी घेऊन आला.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter