Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सोशल मिडियावर पोलीसांची करडी नजर

27-Sep-2019 : सांगली / प्रतिनिधी

सोशल मिडियावरील आक्षेपार्ह मजकूर, पोस्ट, व्हिडिओवर पोलिसाची करडी नजर असणार आहे.

काही समाजकंटकांकडून युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सऍप अशा सोशल मिेडियावरून समाजात सामाजिक, राजकीय आणि जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आक्षेपार्ह मेसेज, पोस्ट, व्हिडिओ, इमेजेस व्हायरल केले जातात. त्यामुळे शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्था निर्माण होते.पोलीस अधीक्षक कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोशल मिडिया मॉनिटरिंग सेल स्थापन करण्यात आला आहे. या सेलच्या माध्यमातून सोशल मिडियावर नजर ठेवण्यात येईल. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. कोणीही कोणताही मेसेज, व्हिडिओ, पोस्ट न वाचता न समजून घेता पुढे पाठविल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल. असे सोशल मिडिया मॉनेटरिंग सेलकडून कळविण्यात आले आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter