Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगलीतील कॉंग्रेस उमेदवारीचा सोमवारी दिल्लीत फैसला

28-Sep-2019 : सांगली / प्रतिनिधी

सांगली विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी कॉंग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यावी, याबाबत राज्यातील नेत्यांचे एकमत होत नसल्याने याचा निर्णय सोमवारी दिल्लीतील बैठकीत होणार अस ल्याचे बोलले जात आहे.

सांगली विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस पक्षात उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली आहे. सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. पृथ्वीराज पाटील यांनी सांगली लोकसभेसाठी तयारी केली होती , पण ऐनवेळी ही जागा स्वाभिमानी शेतकरी पक्षाला सोडावी लागली तर कॉंग्रेसचे विशाल पाटील हे स्वाभिमानीच्या चिन्हावर लढले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter