Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
इस्लामपुरात प्लास्टिक पिशव्या जप्त

28-Sep-2019 : इस्लामपूर / प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर इस्लामपूर शहरामध्ये प्लास्टिक बंदी प्रभावीपणे राबविण्यासाठी नगरपालिकेमार्फत मोठ्या प्रमाणात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात प्लास्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या.

शहरातील नागरिक, शासकीय, अशासकीय संस्था, सेवाभावी संस्था, धार्मिक संस्था, डॉक्टर असोसिएशन, इंजिनिअर असोसिएशन, शाळा, महाविद्यालये, सर्व व्यापारी आस्थापने, बार असोसिएशन, व्यापारी संघटनांना प्रशासनाने प्लास्टिक बंदीची माहिती दिली आहे. नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी प्लास्टिक बंदीबाबत माहिती देणारे माहिती फलक शहरामध्ये लावले आहेत. नगरपालिकेमार्फत प्लास्टिक संकलन केंद्र सुरू आहे

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter