Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ : पतीसह तिघांविरूध्द गुन्हा

28-Sep-2019 : सांगली / प्रतिनिधी

विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर येथील तिघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती आदेश श्रीचंद गंगवाणी, श्रीचंद बिकचंद गंगवाणी आणि राजेश श्रीचंद गंगवाणी अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी विवाहिता पूनम आदेश गंगवाणी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली होती. पूनम यांचा २००२ साली गांधीनगर येथील आदेश यांच्याशी विवाह झाला होता. लग्नात पूनमच्या माहेरच्यांनी जवळपास २३ तोळे सोन्याचे दागिने व चांदीची भांडी दिली होती. सासरच्या लोकांचा मानपान केला होता. लग्नानंतर काही दिवस व्यवस्थित नांदवल्यानंतर किरकोळ कारणातून पूनम यांचा अपमान करण्यात येऊ लागला.त्यांचा मानसिक छळ करण्यात येऊ लागला. तू अडाणी व गावठी आहेस आणि तुला मोठ्या घरात राहता येत नाही असे म्हणून टोमणे मारण्यात येऊ लागले. माहेरच्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अखेरीस वैतागलेल्या पूनम यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात छळाची फिर्याद दिली आहे. तिच्या फिर्यादीवरून सासरच्या तिघांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter