Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगलीत १८ लाखांचा विदेशी मद्यसाठा हस्तगत : दोघांना अटक

28-Sep-2019 : सांगली प प्रतिनिधी

राज्य उत्पादन शुल्क विभागाने एसटी स्टॅन्ड परिसरातील एका पडक्या घरात बेकायदेशीररीत्या साठा केलेले १८ लाख ३ हजार ७४२ रु. किंमतीचे विदेशी मद्य जप्त केले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम आखली आहे.त्यानुसार भरारी आणि विशेष दक्षता पथकाला एस.टी. स्टॅन्ड परिसरातील एका पडक्या घरात बेकायदेशीररीत्या विदेशी दारूचा साठा ठेवला असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पथकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक व्ही.ए. देशमुख, पी. एस. शेतसंधी, एस.के.बर्गे, डी.पी.घाटगे, तडवळकर, श्रीमती पाटील यांच्यासह पथकातील अन्य जवानांनी कारवाई केली. अवधूत श्रीकांत टेरसंग (वय २५, रा.वेणाबाई मठाजवळ, मिरज), संजय बाबासाहेब टाकवडे (वय २४, रा.बाल हनुमाननगर, म्हैसाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना अटक करून त्यांची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter