Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
दांडिया खेळताना युवतीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

28-Sep-2019 : सलगरे/ वार्ताहर

नवरात्र उत्सवा निमित्त दांडियाचा सराव करताना ह्रदय विकाराचा झटका आल्यामुळे सलगरे गावचे माजी उपसरपंच रमेश माळी यांची कन्या कु. पूजा रमेश माळी हिचा शुक्रवारी रात्री अचानक मृत्यू झाल्याने माळी समाजासह संपूर्ण सलगरे गावात हळहळ व्यक्त केली जात असून सलगरे येथे शोककळा पसरली आहे.

पूजा ही रमेश माळी यांची एकुलती एक मुलगी होती. ती सलगरे येथील विठ्ठल दाजी पाटील महाविद्यालयात विज्ञान शाखेत पहिल्या वर्गात शिकत होतो. ती प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सर्व स्पर्धांमध्ये भाग घेत असल्यामूळे विद्यार्थी व शिक्षक वर्गाची कायमच आवडती विद्यार्थिनी राहीली आहे , शिवाय घरातील बहिणी भावंडात सुध्दा ती आवडती होती.

पूजाच्या अचानक मृत्यूने माळी कुटुंबियांवर फार मोठा आघात झालेला असून, पूजाच्या पश्‍चात एक भाऊ, आई, वडील, चुलते, चुलत भाऊ, चुलत बहिणी, असा मोठा परिवार आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter