Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
मिरजेतील तरुणाकडून गावठी पिस्तुल हस्तगत

28-Sep-2019 : सांगली / प्रतिनिधी

एलसीबीने मिरजेतून एकाकडून देशी बनावटीचे एक गावठी पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे असा ५० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधितास ताब्यात घेण्यात आले आहे.

एलसीबीचे पथक मिरजेत पेट्रोलिंग करीत असताना पथकातील सचिन धोत्रे व विकास भोसले यांना मिरजेतील साई कॉलनीतील चिंचेच्या झाडाजवळ एकजण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्या परिसरात सापळा लावून संबंधितास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव अभिजित लोहार (वय २७, रा.मालगाव रोड, खोतनगर, मिरज) असे सांगितले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter