28-Sep-2019 : सांगली/ प्रतिनिधी
आम्हाला ईडी, सीबीआय यांची भीती वाटत नाही. फक्त पोलिसांची भीती आहे. राजकीय फायदा कसा घ्यायचा, तपास यंत्रणांचा दुरुपयोग कसा करून घ्यायचा हे भाजप सरकारकडून शिकावे. सध्या आणीबाणीहून अधिक भयंकर स्थिती असून ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचे अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे कार्यकर्ते असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली. विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे ५० जागांची मागणी केली आहे. महाआघाडीचे जागा वाटप दोन-तीन दिवसांत पूर्ण होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आले असता माजी खा. शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरकारी यंत्रणेतील अधिकारी भाजप सरकारच्या दावणीला बांधले गेले आहेत. विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स या संस्थांचा वापर केला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वैमनस्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचा प्रयत्न केला , पवार यांचा राज्य सहकारी बँकेशी कोणताही संबंध नसताना त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला. मोदी आणि शहा यांच्या तालावर ईडी, सीबीआयचे अधिकारी कार्यकर्ते म्हणून काम करीत असल्याचे स्पष्ट दिसते.
दोन-तीन दिवसांत जागावाटप होईल...
निवडणुकीसाठी कॉंगे्रस-राष्ट्रवादीसह छोट्या-मोठ्या मित्र पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केली आहे. त्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आम्हांला ५० जागा सोडाव्या अशी मागणी आहे. त्यांनी सध्या ३८ जागा देण्यास सहमती दर्शविली होती. त्यामुळे उर्वरित १२ जागा वाढवून देण्यात महाआघाडीला कोणतीही अडचण नाही. आघाडीची जागा वाटपाबाबत सातत्याने चर्चा सुरु आहे, त्याबाबतचा निर्णय दोन-तीन दिवसात होईल. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने ५० जागा सोडल्यानंतर आम्ही उमेदवार देणार आहोत. आघाडीत कोणतेही मतभेद न ठेवता योग्य पद्धतीने जागा वाटप करण्यात येईल.
जिल्ह्यात तीन जागांची मागणी
स्वाभीमानी शेतकरी संघटनेने सांगली जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांवर दावा केलेला आहे. आघाडीचे जागावाटप जवळजवळ निश्चित झाले आहे. आम्ही खानापूर-आटपाडी, मिरज आणि जत जागेची मागणी केली आहे. आमच्याकडे उमेदवारही तयार आहेत. खानापूरमधून महेश खराडे हे उमेदवार असतील, असे शेट्टींनी जाहीर केले. कोल्हापूरमधून शिरोळ, हातकणंगले आणि राधानगरीच्या जागेची मागणी केली आहे. शिरोळमधून मी लढण्याची चर्चा सुरु आहे, विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत अजून माझा निर्णय झालेला नाही. मुंबईमध्ये शेकाप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगोलामधून विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे , मात्र निवडणूक लढविण्याबाबत अद्याप मी कोणताही निर्णय घेतलेला नाही.
शासनाकडून पूरग्रस्तांची फसवणूक...
महापूर येऊन दोन महिने उलटले तरी कोणत्याही आश्वासनाची पूर्तता केली नाही. कोणतेही अनुदान अद्याप मिळलेलं नाही. शासनाने पूरग्रस्तांची फसवणूक केली असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. सानुग्रह उर्वरित अनुदानाची ग्रामीणमध्ये पाच आणि शहरी भागात दहा हजारांची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा केलेली नाही. ज्यांची घरे पडलेली आहेत, त्यांना घरभाडे अद्याप दिलेले नाही. छोट्या मोठ्या व्यापार्यांचे नुकसान झाले आहे, त्या व्यापार्यांना जाहीर केलेली मदत अद्याप मिळालेली नाही. हातावर पोट असलेल्या व्यापार्यांना सर्वांनीच वार्यावर सोडलेलं आहे. विमा कंपन्या या व्यापार्यांना भयंकर त्रास देत आहेत. शेतीच्या बाबतीत मदत अद्याप दिली नाही. सरकारने घाई गडबडीत कर्जमाफी जाहीर केली, मात्र त्या शेतकर्यांची यादी सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही. तातडीने यादी जाहीर होणं गरजेचं होते, मात्र अजून एक महिना लागेल, अशी वस्तुस्थिती आहे.
पूरग्रस्तांचा रोष मतदानातून २१ ऑक्टोबरला कळेल...
पूर ओसरून दीड महिना झाला तरी अजून मदत का मिळत नाही ? आता फक्त मंत्र्यांना पुरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. २१ ऑक्टोबरला मतदानातून या सरकारला पुरग्रस्तांचा रोष काय आहे हे कळेल, असा इशाराही माजी शेट्टी यांनी दिला. शेतकर्यांचं मोठं नुकसान झाल्याने मोठे आर्थिक संकट शेतकर्यांवर आलं आहे. अशा परिस्थिती बँकाही हात वर करत आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये जर मदत मिळाली नाही,
|