Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
महापुराच्या काळात भाजपकडून जनता बेदखल

10-Oct-2019 : सांगली / प्रतिनिधी

महापुराने सांगलीकरांचे अतोनात हाल सुरू असताना भाजपचे मंत्री व सांगलीचे आमदार फिरकले नाहीत. जनतेला आधार व मदत करण्याची माणुसकी भाजपवाल्यांकडे नाही. महापूराने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना, नागरिकांना व व्यापार्‍यांना अद्याप मदत मिळालेली नाही. आता निवडणुका आहेत. भाजपचे विद्यमान आमदार मतांसाठी पुन्हा दारात येतील त्यांना जनतेने जाब विचारावा, असे आवाहन कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट) इतर पक्ष महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी केले.

कॉंग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी प्रभाग क्रमांक १२ व १४ मधील मतदारांची बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी रामटेकडी कार्यालयात त्यांची सभा झाली. या सभेत पृथ्वीराज पाटील बोलत होते. सभेला माजी नगरसेवक प्रमोद सुर्यवंशी, अजित सुर्यवंशी, नंदकुमार अंगडी, कय्युम पटवेगार, योगेश राणे, संजय उर्फ चिंटू पवार, अविनाश जाधव, स्वाती सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

पृथ्वीराज पाटील पुढे म्हणाले, ऑगस्टमध्ये सांगलीत महापूर आला. नागरिकांचे हाल झाले. त्यांना माणुसकी व आपुलकी म्हणून फौंडेशनच्या माध्यमातून मदत करण्यात आली. आपल्या सुख-दु:खात जो मदत करतो तोच आपला माणूस असतो.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter