10-Oct-2019 : इस्लामपूर प प्रतिनिधी
आ.शिवाजीराव नाईक व कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले सत्यजीत देशमुख यांच्या एकत्रीत ताकदीमुळे राष्ट्रवादीचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांची दमछाक होताना दिसत आहे.
सन २०१४ च्या निवडणुकीत शिवाजीराव नाईक यांना ८५३६३ मते पडली होती तर मानसिंगराव नाईक यांना ८१६९५ इतकी मते पडली होती , तर कॉंग्रेसचे सत्यजीत देशमुख यांना ४५१३५ इतकी मते पडली होती. यावेळी सत्यजीत देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या मतांची बेरीज होऊ शकते. शिराळा तालुक्यातून या दोन गटाच्या एकत्रिकरणामुळे मिळणारे मताधिक्य मानसिंगराव नाईकांच्या चिंतेचा विषय बनला आहे.
|