Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
गौरव नायकवडींच्या वैचारिक ‘यु टर्न’ची सोशल मिडियावर चर्चा

10-Oct-2019 : सांगली / प्रतिनिधी

नागनाथअण्णा नायकवडी यांनी आयुष्यभर पुरोगामी विचारांची कास धरली. असे असताना त्यांचाच नातू वेगळ्या विचारांची बांधिलकी ठेऊ पाहत असल्यामुळे त्यांचा नवा झेंंडा अण्णांच्या अनुयायांना रुचेल का? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागलेला आहे. डाव्या विचारांची अण्णांची धुरा उजव्या विचाराने नातू कसा सांभाळणार? असा प्रश्‍न आता मतदार संघात विरोधकांकडून सोशल मिडियातून विचारला जात आहे.

एका खून प्रकरणा संबंधी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे फेरी मारलेल्या युवा नेत्याची उमेदवारी जनतेला रूचणार का? जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला असताना व्यापक असणार्‍या विधानसभा मतदारसंघात त्यांचा निभाव लागणार का? असे विविध प्रश्‍न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत.

मतदारसंघात दोन नगरपालिकांसह ५७ गावांमध्ये संपर्क करणे सोपे नाही. गौरव नायकवडी यांच्यासमोर असणार्‍या बलाढ्य उमेदवारांनी मतदारसंघ अनेक वर्षांपासून पिंजून काढला आहे. मतदानाला अवघे १० दिवस शिल्लक असताना कोणतेही ठोस नियोजन झालेले दिसून येत नाही.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter