Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
अनेक घरांमध्ये जयंत पाटलांनी दुही निर्माण केली : निशिकांत पाटील

10-Oct-2019 : इस्लामपूर / प्रतिनिधी

गटातटाच्या राजकारणाबरोबर अनेकांच्या घरामध्ये दुही निर्माण करण्याचं काम जयंत पाटील यांनी गेली ३० वर्षे केले. ऊसतोड असेल किंवा ऊस दर असेल यामध्ये मतदारसंघातील शेतकरी बांधव भरडला गेला आहे. नव्याने कारखान्याचे सभासद न करणे व मयत सभासदांच्या वारसानांही सभासद करून न घेणे हा क्रांतीकारकांच्या भूमीतील प्रत्येक कष्टकर्‍याचा अवमान आहे. हे सर्व मोडीत काढण्यासाठी व आपल्या सर्वांना स्वाभीमानाने जगता यावे, राहता यावे यासाठीच माझी उमेदवारी आहे. असे मत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी व्यक्त केले.

इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील रेठरेहरणाक्ष, दुधारी, ताकारी, बनेवाडी, साटपेवाडी, गौंडवाडी या गावातील मतदारांच्या बैठकीत बोलत होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter