05-Nov-2019 : मिरज / प्रतिनिधी
मिरजेतील कृष्णानदीवर पोहायला गेलेला निहाल लतीफ बेपारी (वय १९ रा. बोकडगल्ली) हा युवक बेपत्ता झाला आहे. या घटनेची मिरज गांधी चौकी पोलिसात नोंद झाली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, निहाल बेपारी व अवेज इम्रान बेपारी हे दोघे चुलत भाऊ एमआयडीसी येथे कामाला जातात. मंगळवारी एमआयडीसीला सुट्टी असल्याने दोघेही कृष्णा नदीवर पोहण्यासाठी तसेच मासे पकडण्यासाठी म्हणून सकाळी मोटर सायकलवरून गेले होते. निहाल याने कृष्णाघाटावर असलेल्या बुरूजावरून नदीत उडी घेतली. निहाल हा पोहत घाटाकडे येत असताना मध्यभागी आल्यानंतर तो अचानक पाण्यात बुडू लागला. त्याचा भाऊ अवेज बेपारी हा ही मासे पकडण्यासाठी उभा होता. त्यालाही अचानक निहाल असा का करीत आहे हे कळेना, त्याने निहालला हाक मारली , परंतु तो बुडत होता.
घाटावर असलेल्या लोकांनी त्याचा शोघ घेतला, परंतु निहाल बेपारी याचा उशिरापर्यंत शोध घेण्यात शोध पथकाला यश आले नाही.
|