11-Jan-2020 : तरुणास अटक
जत / प्रतिनिधी
जत तालुक्यातील रामपूर येथे विधवा महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवानंद उर्फ दादू माळी (रा. रामपुर) या तरूणाविरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली.
या बाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विधवा महिला घरी जात असताना त्या महिलेला शिवानंद माळी याने अडविले व पाच मिनिटे डोंगराजवळ चल असे म्हणत या महिलेस जबरदस्तीने झुडपात घेऊन गेला व त्याने अश्लिल चाळे केले. महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी त्याने दिली. संबंधित महिलेने जत पोलिस ठाण्यात शिवानंद माळी याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. शिवानंद माळीला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास एपीआय मोहीते करीत आहेत.
|