16-Feb-2020 : विटा / प्रतिनिधी
पंचवीस दिवसांत दहा कोटी रूपये कर्ज मंजूर करून देतो असे सांगून व्यावसायिकाची तीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत विटा पोलिसात संजय बाळासाहेब शिंदे (रा. खानापूर, मूळ रा. जरंडी, ता. तासगांव) यांनी अर्जुन रामचंद्र पाटील (मुळ रा. कंदलगांव, जि. कोल्हापूर, सध्या हडपसर, पुणे), संकेत सातपुते (पुणे), बंटी गोंधळे (पुर्ण नांव माहित नाही) व अन्य एकजण (पुर्ण नांव माहित नाही) या चौघांविरुद्ध फिर्याद दिली आहे. ही फसवणूक २ जानेवारी २०१९ ते आजपर्यंत केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिंदे यांचा अनिता सुपर शॉपी नावाचा खानापूर येथे व्यवसाय आहे. वरील चौघांनी शिंदे यांना पंचवीस दिवसात दहा कोटी रुपये कर्ज मंजूर करून देतो असे सांगून कर्ज मंजूरीसाठी २ जानेवारी २०१९ ला त्यांच्या आयर्न ्प्रोजेक्ट प्रा. लि. कोल्हापूर या कंपनीच्या नांवे असलेल्या आयडीबीआय बँक खात्यावर पंधरा लाख रूपये भरण्यास सांगितले. शिंदे यांनी त्यांच्या बँक ऑफ इंडिया बँकेच्या खात्यातून पंधरा लाख रुपये पाठविले. पुन्हा ३ व ४ जानेवारीला चार व एक लाख त्यांच्या खात्यावर पाठविले.
|