16-Feb-2020 : सांगली प प्रतिनिधी
येथील सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील हॉटेल साई डिलक्स लॉजमध्ये काही दिवसांपूर्वी प्रसन्नराज प्रकाश शहा या तरुणाच्या आत्महत्याप्रकरणी सांगलीतील चौघा व्यापार्यांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी मयत प्रसन्नराज याचे वडील प्रकाश कांतीलाल शहा (वय ६२, रा.किसान चौक, सांगलीवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
प्रसन्नराज शहा याने ८ फेब्रुवारी रोजी सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील हॉटेल साई डिलक्समध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. प्रसन्नराज याला हरिया पटेल, योगेश हरिया पटेल, अरविंद हरिया पटेल यांनी २५ लाख रु. भरल्यास तुम्हाला २५ टक्के भागीदारी मिळेल असे सांगितले होते. वसंत पटेल यांनी याबाबत माहिती दिली होती. शहा याने त्यांच्या नातेवाईकांकडून उसनी रक्कम घेऊन संबंधितांना दिली होती. भागीदारीबाबत करारपत्र करुन द्या अशी मागणी करत असताना त्यांनी टाळाटाळ केली, प्रसन्नराज याला धमकी देत भागीदारीचा विषय काढायचा नाही , पैसे परत देत नाही. परत आलास तर जिवंत ठेवणार नाही. आमच्या नादाला लागलास तर तुझ्यावर खंडणीचा आणि सावकारीचा गुन्हा दाखल करु अशी धमकी दिली.
|