Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
घोलेश्‍वरमध्ये विजेच्या ठिणग्या पडून कणसासह कडबा भस्मसात

16-Feb-2020 : जत / प्रतिनिधी

जत तालुक्यातील घोलेश्‍वर येथील तांबे वस्तीवरील बाळासाहेब सेनाप्पा तांबे यांचा कणसासह असलेला कडबा विजेच्या ठिणग्या पडून जळून खाक झाला. महावितरण व शेजारील मुजावर या वीज ग्राहकाने मेन लाईनला केलेल्या छेडछाडीमुळे हा प्रकार घडला आहे. या घटनेत तांबे यांचे हातातोंडाशी आलेले धान्य व कडबा जळून खाक झाला आहे. महावितरणने दोषीवर कारवाई करावी व तांबे यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी होत आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, घोलेश्‍वर येथील तांबे वस्ती येथे बाळासाहेब तांबे यांची वस्ती आहे. घरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतातून निघालेला दीड ट्रॅक्टर ज्वारीचा कणसासह कडबा आणून टाकला होता. त्यांच्या घराजवळच डी पी आहे आहे. या डीपीकडून मुजावर यांच्या घराकडे जाणार्‍या तारा लूज पडल्याने तारांचे घर्षण होवून ठिणग्या पडत होत्या. शनिवारी ठिणग्या पडून गवताने पेटही घेतला होता. तारा चिटकून ठिणग्या पडत असल्याने तांबे यांनी मुजावर यांना वीज कनेक्शन चालू करू नये, वायरमनला कळवा असे सांगितले होते. असे असतानाही मुजावर यांनी लोंबकळत असलेल्या ताराला दगड बांधून वीज कनेक्शन सुरू केले. रविवारी दुपारी तीन वाजता तारा चिकटून जाळ झाला व त्यामुळे गवताने पेटले. कणसासह कडबा जळून खाक झाला.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter