Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
ना.जयंतराव पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

16-Feb-2020 : इस्लामपूर / प्रतिनिधी

राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कर्नाटक राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री श्रीमंत पाटील, आ.मानसिंग नाईक, माजी आमदार के.पी.पाटील, मिलिंद कांबळे, राजीव आवळे, दिनकरतात्या पाटील, अरुणअण्णा लाड, लालासाहेब यादव, अविनाश मोहिते, इंद्रजित मोहिते, सारंग पाटील, माजी महापौर इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, पृथ्वीराज पाटील, ऍड.बाबासाहेब मुळीक, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, हुपरीचे उपनगराध्यक्ष अमर लट्टे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. ना.पाटील यांनी राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्व.बापूंच्या पुतळा परिसरात थांबून शुभेच्छा स्वीकारल्या. इस्लामपूर, आष्टा शहरांसह वाळवा तालुक्यातील गावो-गावचे कार्यकर्ते तसेच सांगली जिल्ह्यासह राज्यातून आलेल्या हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक, महिलांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला. ना.पाटील यांनी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत या शुभेच्छा स्वीकारल्या.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter