Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
कडेगावमध्ये पिकाच्या वादातून विळ्याने केलेल्या हल्ल्यात महिला गंभीर

29-Feb-2020 : कडेगाव / प्रतिनिधी

तालुक्यातील शिवाजीनगर येथील उज्वला धनाजी साळुंखे (वय २५) या महिलेवर ऊस पिकाच्या वादातून विळ्याने खुनी हल्ला करुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी संशयित आरोपी संदीप सीताराम साळुंखे, त्याची पत्नी पूजा संदीप साळुंखे, शारदा सीताराम साळुंखे, वैभव अशोक साळुंखे (सर्व रा.शिवाजीनगर) यांच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शुक्रवार (दि.२८) रोजी सकाळी घडली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उज्वला धनाजी साळुंखे यांची शेती तालुक्यातील शिवाजीनगर येथे आहे. त्यांनी शेतात ऊस पीक घेतले होते. दरम्यान शुक्रवार (दि.२८) रोजी सकाळी ८ वा. च्या सुमारास ऊस पिकाच्या वादातून , ऊसाच्या सरी मशिनने तोडल्याच्या कारणावरून संशयित आरोपी संदीप साळुंखे याने उज्वला यांच्या डाव्या हातावर विळा मारून त्यांना गंभीर जखमी केले , तर त्यांचा दीर लक्ष्मण महादेव साळुंखे यास संशयित शारदा सीताराम साळुंखे हिने उजव्या हाताच्या दंडाला जोरदार चावा घेऊन जखमी केले , तर उज्वला यांची आई व पती यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तसेच शिवीगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान या प्रकरणी उज्वला साळुंखे यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयित संदीप साळुंखे, त्याची पत्नी पूजा साळुंखे, शारदा साळुंखे आणि वैभव साळुंखे यांच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस करीत आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter