29-Feb-2020 : सांगली / प्रतिनिधी
आकाशवाणी समोरील जैन मंदिर, सुभाषनगरमधील बाळुमामा मंदिर, सोनी गावातील ओढ्याकाठचे मंदिर आणि म्हैसाळमधील जैन मंदिर या देवाच्या घरातच चोर्या करणार्या सराईत गुन्हेगाराचा छडा लावण्यात एलसीबीला यश आले असून पोलिसांनी चोरटा विजय राजू म्हस्के (वय २४, रा.रेवणी गल्ली, मिरज) याच्या मुसक्या आवळल्या.
याबाबत अधिक माहिती अशी, की , विविध ठिकाणी होत असलेल्या घरफोड्यांबाबत छडा लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक सांगली विभागात गस्त घालत असताना पोलीसांना सराफ कट्टा ते टिळक चौकाकडे जाणार्या रस्त्यावर विजय म्हस्के उर्फ बुटका वीज्या हा सोन्या-चांदीचे दागिने दाखवत फिरत असून त्याने फुल चॉकलेटी टी शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स घातल्याची माहिती मिळाली.
|