29-Feb-2020 : इस्लामपूर / प्रतिनिधी
इस्लामपूर-बहे मार्गावर तुकाई मंदिर परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार उमेश दत्तात्रय सुर्वे (रा.नरसिंहपूर, ता.वाळवा) हे गंभीर जखमी झाले . शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास अपघात घडला. या घटनेची नोंद इस्लामपूर पोलिसात झाली आहे. अपघातप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की , २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास उमेश सुर्वे हे दुचाकीवरून (क्र. एमएच १० / एएफ ४२७१ इस्लामपूरहून नरसिंहपूरला निघाले होते. इस्लामपूर-बहे मार्गावर तुकाईमंदिर परिसरात दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत उमेश सुर्वे हे रस्त्यावर जोराने आदळल्याने त्यांच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस मार लागला.
ते रस्त्यावर बेशुध्द अवस्थेत पडले होते. या अपघाताची माहिती नागरिकांनी उमेश यांचे चुलत भाऊ प्रमोद सुर्वे यांना दिली. जखमी उमेश सुर्वे यांना उपजिल्हा रूग्णालय येथे दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना सांगली सिव्हील येथे हलविण्यात आले , परंतू ते शुध्दीवर आले नसल्याने त्यांना कोल्हापूर येथील डॉ.प्रभू हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले आहे. याबाबतची फिर्याद प्रमोद सुर्वे याने दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
|