29-Feb-2020 : जत / प्रतिनिधी
बोलेरो रस्त्याकडील पुलावरून पडून झालेल्या अपघातात १७ वर्षीय प्रथमेश शिवाजी सावंत हा शेगावमधील तरुण ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
शेगाव येथील प्रथमेश शिवाजी सावंत हा जत येथील राजे रामराव महाविद्यालयात बारावीच्या सायन्स विभागात शिकण्यास होता. बारावीला असल्याने तो जत येथीलच मोरे कॉलनी येथे रुममध्ये राहण्यास होता. सध्या बारावीचे पेपर सुरू आहेत. प्रथमेश याचा एकच पेपर राहिल्याने तो रुमधील साहित्य परत घेवून जाण्यासाठी वडीलांची बलोरो गाडी घेवून जतला आला होता. रुमवरील साहित्य घेवून शेगावकडे जात असताना जतपासून शेगावकडे जाणार्या मार्गावर असलेल्या सैनिक नगर येथे प्रथमेशचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी पुलावरून थेट रस्त्यालगत असलेल्या खड्यात जावून पडली. यात प्रथमेशच्या डोक्याला जबर मार लागून त्यातच त्याचा मृत्यू झाला.
|