19-Mar-2020 : सांगली / प्रतिनिधी
सध्या सर्वत्र पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या भीतीने थैमान घातले असून एसटीच्या सांगली विभागाने १८ जानेवारी अखेर तब्बल ५ हजार ३६० फेर्या रद्द केल्याने २ लाख ५६ हजार ९९२ किमी अंतर रद्द झाले आहे. फेर्या रद्द केल्याने सांगली विभागाचे ७६ लाख ३० हजार ३७३ रु.चे उत्पन्न बुडाले आहे.
सध्या कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे.त्याचा फटका अनेकांना बसला आहे.याचा फटका एसटीच्या सांगली विभागालाही बसला आहे.१४ रोजी ४३२ फेर्या रद्द झाल्याने २८५०७ किमी अंतर रद्द झाले असून ८लाख ११ हजार ३५३ रु.चे उत्पन्न बुडाले आहे.१५ रोजी १३४९ फेर्या रद्द झाल्याने ६७ हजार ७०७ किमी अंतर रद्द झाले आहे.त्यामुळे २२ लाख ७५ हजार ८२४ रु.चे उत्पन्न बुडाले आहे.तसेच १६ रोजी ९८५ फेर्या रद्द झाल्याने ४९ हजार २९० किमी अंतर रद्द झाले आहे आणि १४ लाख १५ हजार १९ रु.चे उत्पन्न बुडाले आहे.१७ रोजी १४४४ फेर्या रद्द झाल्याने ५२ हजार ९५ किमी अंतर रद्द झाले असून १३ लाख ७५ हजार १४२ रु.चे उत्पन्न बुडाले आहे.
|