Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
दोन दिवसात २७ जणांची जामिनावर कारागृहातून मुक्तता

19-Mar-2020 : सांगली / प्रतिनिधी

कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन न्यायालयाच्या आदेशानुसार सांगली कारागृहातून दोन दिवसात २७ जणांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

संपूर्ण जगात सध्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी बंदचे आदेश देण्यात आले आहेत.सांगली कारागृहातही याचे पडसाद उमटले आहेत.सध्या सांगली कारागृहाची क्षमता २३५ ची आहे. प्रत्यक्षात तेथे ३४४ कैदी ठेवण्यात आले आहेत. क्षमतेपेक्षा १०९ कैदी अधिक आहेत. यामध्ये ३०२ च्या गुन्ह्यातील १२७ तर न्यायालयीन कोठडी असणारे २१४ बंदी आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनावर त्यांच्या सुरक्षाचा ताण पडला आहे. कारागृह प्रशासनाने कैद्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बराकमध्ये हँडवॉश ठेवला आहे.प्रशासनाने कैद्यांसाठी शिबीर घेतले होते.त्यांच्यात जागृती केली होती. न्यायालयीन कामकाजासाठी कैद्यांना न्यायालयात न नेता व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून त्यांचे कामकाज चालविण्यात येत आहे. याबाबतचे आदेश न्यायालयाने दिले होते. कारागृह प्रशासनाने याबाबत न्यायालयाला विनंती केली होती.आत असणार्‍या सर्व बंद्यांवर लक्ष ठेवले जात आहे.कोणाला काही प्रादुर्भाव झाल्यास त्यांच्यासाठी ५ विशेष कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. आवश्यकता वाटल्यास त्यांना त्या ठिकाणी ठेवले जाणार आहे. बंद्यांची योग्य काळजी घेतली जात आहे. स्वतःची काळजी कशी घ्यावी याचीही माहिती बंद्यांना देण्यात आली आहे. तसेच बंदी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संमतीने काही दिवसासाठी घरभेट बंद करण्यात आली आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter