19-Mar-2020 : सांगली / प्रतिनिधी
महापालिका क्षेत्रात परदेशातील लोक येत आहेत. त्यांची आरोग्य तपासणी करावी, त्यांना घेऊन जावे, असे दूरध्वनी नागरिकांकडून महापालिकेच्या नियंत्रण कक्षाकडे येऊ लागले आहेत. मनपाने देखील याची तत्काळ दखल घेऊन आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी २४ तास काम करत आहेत. महापालिका प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. क्कारंटाईन व विलगीकरण कक्ष, तेथील सुविधा, उद्याने, क्रीडांगणे बंद, शहरात स्वच्छता मोहिम, आरोग्य सेविकामार्फत घर टू घर सर्व्हेक्षण अशी अनेक कामे हाती घेतली आहेत. कोरोनाबाबत नागरिकांच्या तक्रारी, जनजागृतीसाठी महापालिकेने स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाची जबाबदारी अग्निशमन विभागावर सोपविली आहे. प्रतापसिंह उद्यानाजवळील अग्निशमन कार्यालयात चोवीस तास निंयत्रण कक्ष सुरू आहे.
गेल्या चार दिवसात या कक्षाकडे बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती देण्यासाठी पंधराहून अधिक दूरध्वनी आले. कोण दुबईतून आले होते, तर कोण अमेरिकेतून आले होते.
|