19-Mar-2020 : सांगली / प्रतिनिधी
कोरोनाचा प्रसार वाढू नये, याची खबरदारी म्हणून प्रशासनाने मार्केट यार्डातील सौदेही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा परिणाम उलाढालीवर झाला असून सुमारे २० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. हळदीचे सौदे पूर्णपणे बंद राहीले. गुळाचे सौदे मात्र काही प्रमाणात खासगी पातळीवर झाल्याची चर्चा असून गुळाचे सुमारे पन्नास टक्के सौदे झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पणन विभागाने धान्याचे व्यवहार मात्र सुरूच ठेवावेत, असे आदेश दिले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पोलिसांनी मध्यस्थी करीत ३१ मार्चपर्यंत सौदे बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेतला होता. व्यापारी आणि अडत्यांनी सौदे सुरु ठेवून गर्दी केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. करोना या संसर्गजन्य विषाणचा सर्वत्र फैलाव वाढत आहे.
|