Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगली एसटी स्टँडवरून ६० हजारांच्या साहित्याची चोरी

19-Mar-2020 : सांगली / प्रतिनिधी

सांगली एसटी स्टँडवरील प्लॅटफॉर्म नं-१ वरून ६० हजार रु.किमतीचा कॅमेरा व अन्य साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार श्रीकांत कृष्णा निपाने (वय ३७, रा.निगुडमाळ, सातारा) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

सदरची घटना १८ मार्च रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या दरम्यान सांगली बस स्थानकावरील प्लॅटफॉर्म नं-१ वर घडली होती. फिर्यादी हे घटनेच्या दिवशी त्यांचे काम आटोपून गावी जाण्यासाठी स्टॅण्डवर आले होते.त्यावेळी चोरट्याने संधी साधून त्यांचा सोनी कंपनीचा कॅमेरा,फ्लॅश,६४ जीबीचे मेमरी कार्ड असा ६० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. कॅमेरा गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर निपाने यांनी आजूबाजूला शोध घेतला. परंतु कॅमेरा सापडला नाही. अखेरीस त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter