19-Mar-2020 : सांगली / प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परमीट रुम , बार तसेच ताडी विक्रीची दुकाने शुक्रवारपासून (दि. २०) ते ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने गुरुवारी घेतला. जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये गर्दी होवू नये, यासाठी दररोज ५० टक्के व्यापारपेठा बंद करण्याचे आदेशही जिल्हा धिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. परदेशातून येणार्या प्रवाशांवर प्रशासनाची करडी नजर असून जिल्ह्यात आतापर्यंत २१३ जण बाहेरुन आले आहेत. मालगावमधील ९ प्रवाशांवर होम क्वॉरंटाईनचा शिक्का आरोग्य विभागाकडून मारण्यात आला.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, मात्र जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. धार्मिक स्थळे पर्यटनक्षेत्र, शाळा , महाविद्यालय, मॉल्स तसेच एसटीच्या काही फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात, ती ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने आणि परमीट रुम बार तसेच ताडी विक्रीची दुकानं ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
|