19-Mar-2020 : सांगली / प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व ठिकाणी बंद सदृश्य परिस्थिती व गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी काही ठिकाणी मात्र त्याचा परिणाम दिसून येत नाही. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी आदेश देऊनही सांगली व मिरज शहरातील अनेक पानपट्ट्या गुरुवारी सुरुच असलेल्या दिसल्या.
ज्या थुंकीच्या माध्यमातून कोरोना सर्वात जास्त पसरतो त्यांनाच घटनेचे गांभीर्य नसल्याचे चित्र होते. अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी ढिम्म असल्याचेही या निमित्ताने समोर आले. दरम्यान सांगलीतील गणपती मंदिर व मिरजेतील दर्गाह बंद असताना सांगलीतील मारुती मंदिर, पंचमुखी मारुती मंदिरासह अनेक छोटी-मोठी मंदिरे मात्र सुरु असल्याचे चित्र होते.
दरम्यान महापालिकेने गुरुवारी सर्व प्रभागात एकाच दिवशी औषध, पावडर व धूर फवारणी केली. कोरोना व्हायरसने जगाला हादरवून सोडले आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण आढळून येत आहेत.
|