Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
बाळ्या भोकरेची करायची होती गेम... मकानदार खूनप्रकरणी चौघांना अटक

23-Sep-2017 : सांगली / प्रतिनिधी

सांगलीत टोळी युद्धातून शकील मकानदारचा झालेल्या खूनप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह चौघांना अटक केली असून याप्रकरणी माजी नगरसेवक सचिन सावंतसह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आरोपींकडून बाळ्या भोकरेचाच गेम करण्याचा बेत होता, मात्र साथीदार मकानदार हातात सापडला. त्यामुळे त्याचा खून करण्यात आला, असे तपासात स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली. अटक केलेल्यांमध्ये करण बाळू शिंदे (वय 19), शाम हत्तीकर (वय 23, रा. भारत सूतगिरणीजवळ), सौरभ संजयकुमार शितोळे (वय 20, रा. सावंत प्लॉट) व एक अल्पवयीन आरोपी अशा चौघांचा समावेश आहे.

शकील मकानदार याचा शासकीय रुग्णालयाच्या पिछाडीस असणाऱ्या मराठा सेवा संघाच्या कार्यालयासमोर 10 ते 15 जणांनी लोखंडी रॉड, लाठी आणि जांबियाने वार करून निर्घृण खून केला होता. मयत मकानदार हा पूर्वी सचिन सावंत याच्याकडे काम करत होता. सचिनने मकानदारला गाडीसाठी पैसे दिले होते. मकानदारने ते परत न दिल्याने सचिनने त्याची गाडी ओढून आणली होती. त्यामुळेच दोघांमध्ये आर्थिक कारणावरुन कुरबूर झाली होती. मकानदार सचिनपासून वेगळा झाला होता. तो बाळू भोकरे याच्याकडे काम करत होता.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter