Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
मिरजेत मोकाट कुत्र्याने तोडला बालकाच्या गालाचा लचका
News Image

25-Sep-2017 : मिरज / प्रतिनिधी

माणिकनगर येथील हैदरखान मठाजवळ राहणाऱ्या श्रेयस वडीयार या चार वर्षे बालकाचा मोकाट कुत्र्याने गालाचा लचका तोडल्याने त्याला मिरज शासकीय रूग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. महापालिकेने मोकाट कुत्री पकडली नसल्याने त्यांनी बालकावर हल्ल्ला केल्याचे नागरीकांतून बोलले जात होते. महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.

श्रेयस हा दुपारी 2 वा. सुमारास घरासमोरच आपल्या आईसोबत होता. आई पुढे जात असताना तो पाठीमागून येत होता.त्यावेळी मोकाट कुत्र्याने पाठीमागून येवून श्रेयसवर हल्ला केला. त्यावेळी श्रेयस जोरात किंचाळल्याने पाठी मागे पाहिले असता कुत्र्याने श्रेयसवर हल्ला केल्याने त्या जोरजोरात ओरडू लागल्या. मोकाट कुत्र्याला हुसकाविले. आजुबाजूचे नागरिक गोळा झाले. तोपर्यंत त्या कुत्र्याने श्रेयसच्या गालाचा लचका तोडला होता. श्रेयसचा लचका तोडल्याने तो मोठ्याने रडत होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू होता. त्याला ताबडतोब मिरज शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गालाचा लचका तोडल्याचे परिसरात समजल्यानंतर तेथे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter