Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगलीत पावसाने गुंठेवारीची दैना
News Image

25-Sep-2017 : सांगली / प्रतिनिधी

रविवारी पडलेल्या एक दिवसाच्या मुसळधार पावसाने गुंठेवारी भाग व उपनगरात दैना उडाली आहे. पावसाळ्यापूर्वी आरोग्य विभागाने ड्रेनेज व गटारी सफाईचा फार्स केल्याने शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे रस्ते आता खड्ड्यात गेले आहेत.

रविवारी सायंकाळी सांगली शहर व परिसराला दमदार पावसाने झोडपले. त्यामुळे सांगली शहरातील अनेक मुख्य चौकात व रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. शामरावनगरमधील जनता बँक कॉलनी, विश्वविनायक कॉलनी, श्रीराम कॉलनी, जेष्ठराज कॉलनी, महादेव मंदिर आदी परिसरातील घरांना पावसाच्या पाण्याने वेढा दिला. पंधरा दिवसात दुसऱ्यांदा या भागातील घरांना पाण्याचे वेढा दिला आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शहरातील शंभरफुटी परिसर, विनायकनगर, रामकृष्ण परमहंस सोसायटी, हनुमाननगर, रामनगरातील अनेक गल्ल्या, पंचशीलनगर, काकानगर, दत्तनगर, धामणी रस्त्यावरील पार्श्वनाथ कॉलनी, गुलाब कॉलनी, संजयनगर, सांगलीवाडीमधील उपनगरे, कुपवाडमधील घन:शामनगर, वान्लेसवाडीसह विजयनगरातील अनेक उपनगरे चिखलमय झाली असून मुख्य रस्ते चिखलात रुतले आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter