Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
रामापूर-कमळापूर येथील येरळा नदीच्या पुलावरुन तरुण गेला वाहून
News Image

25-Sep-2017 : कडेगाव / प्रतिनिधी

कडेगाव तालुक्यातील रामापूर-कमळापूर येथील येरळा नदीवर कमी उंचीच्या पुलावरुन सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास दुचाकी बजाज पल्सर गाडीवरुन आळसंदकडुन रामापूरकडे जात असताना पाण्याच्या दाबाने गाडी पुलावरुन नदीत कोसळली त्यातील एकजण बापू विठोबा पवार हे पाण्यातून बाहेर पडता न आल्याने वाहुन गेले आहेत.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी आज दुपारी तीन वाजता धनाजी विष्णु मदने व बापू विठोबा पवार रा.शेरे ता कराड जि.सातारा हे आळसंद येथील नातेवाईकाडे सकाळी गेले होते.परत आपल्या गावाकडे रामापूर मार्गे निघाले होते.येरळा नदीवर रविवारच्या पावसाने पाणी पुलावरुन वाहत असताना दुचाकी पाण्यात घातली. पुलाच्या मध्यावर आल्यावर तोल ढळला व गाडी पुलाच्या खाली कोसळली मदने पोहत बाहेर आले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter