Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सचिन सावंतच्या घरावर छापे

25-Sep-2017 : सांगली / प्रतिनिधी

शुक्रवारी सिव्हील हॉस्पिटलच्यामागे झालेल्या भोकरे टोळीतील शकील मकानदार याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेवक व या प्रकरणाचा मास्टरमाईंड सचिन सावंत याच्या घरावर सोमवारी (दि.25) छापे टाकले. त्याच्या शोधार्थ ठिकठिकाणी पोलिसांची शोधपथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी इम्रान उर्फ माजीद मजीद आवटी (वय 26) यास रविवारी अटक केली होती. त्यास अटक केल्याने अटक केलेल्यांची संख्या पाच झाली आहे. यातील एक अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे.

यातील सहभागी असणाऱ्या अन्य संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची शोधपथके सांगली, जत, मिरज, बेळगावसह अन्य भागात रवाना करण्यात आली आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter