Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
इस्लामपूरात दुचाकीच्या धडकेत एकजण ठार

25-Sep-2017 : इस्लामपूर / प्रतिनिधी

इस्लामपूर-आंबेडकरनाका येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने पादचारी महावीर यशवंत कांबळे (वय 40, रा.आंबेडकरनगर इस्लामपूर) हे ठार झाले. या घटनेची नोंद इस्लामपूर पोलिसात झाली आहे.

रविवार दि. 24 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास महावीर कांबळे हे केळीच्या भट्टीच्या दुकानातून सांगली-पेठ रस्त्याने आंबेडकरनाका येथे घरी निघाले होते. ताटे हॉस्पिटलजवळ दुचाकी क्रमांक एम.एच.10 ए.एन. 689 या दुचाकीने महावीर कांबळे यांना जोराची धडक दिली. या धडकेत ते रस्त्यावर कोसळल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागला व त्यांचा उजवा पाय फॅक्चर झाला. ते जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले त्यांच्या कानातून रक्त येत होते. परिसरातील नागरिकांनी महावीर कांबळे यांना उपचारासाठी प्रकाश हॉस्पिटल येथे दाखल केले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान महावीर कांबळे यांना धडक दिलेली मोटरसायकलवरील चालक अमीर हजीमलग मुल्ला रा.अहिल्यानगर सांगली हा अपघातात जखमी झाला असून त्याला डॉ.सत्रे हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती मिळाली. अमीर मुल्ला याच्याविरोधात इस्लामपूर पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबतची फिर्याद दिपक कांबळे यांनी दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter