Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जितेश कदम म्हणजे ‘भावी आमदार’ सांगली की पलूस-कडेगाव मतदार संघ?

26-Sep-2017 : सांगली / प्रतिनिधी

आ.मोहनराव कदम यांचे नातू व दिवगंत माजी मंत्री मदन पाटील यांचे जावई डॉ.जितेश कदम यांचा वाढदिवस 27 सप्टेंबरला असून त्यानिमित्त सोशल मिडियातून त्यांना ‘भावी आमदार’ म्हणून प्रोजेक्ट केले जात आहे. या फेसबुक कॅम्पेनमुळे ते नेमके सांगली विधानसभा मतदार संघातून की पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार?, अशी चर्चा होवू लागली आहे.

सांगलीच्या राजकारणातदेखील ते सक्रीय सहभाग घेत आहेत. मात्र पलूस-कडेगाव मतदार संघातील विविध निवडणुकीत ते सहभागी होत असतात. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडीत त्यांनी पुढाकार घेत प्रामाणिक सदस्यांची नावे सूचविली होती. सांगली-सातारा विधानपरिषदेच्या निवडणुकीत आ.मोहनराव कदम कॉंग्रेसचे उमेदवार होते. त्यावेळी महापालिकेच्या नगरसेवकांची जबाबदारी जितेश कदमांवर होती. त्यावेळी जितेश कदम यांना सर्व नगरसेवकांच्या कुंडल्या कळाल्या होत्या.

सांगलीच्या राजकारणात जितेश कदम सक्रीय होत आहेत. त्यासाठी विविध कार्यक्रमांना त्यांची आवर्जून हजेरी सुरू आहे. मदन पाटील युवा मंचच्यावतीने ऑगस्ट महिन्यात दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडीच्या कार्यक्रमाला जयश्रीताई पाटील यांच्यासमवेत जितेश कदम उपस्थित होते. त्यांना दहीहंडीच्या रूपाने राजकारणाचे चांगले व्यासपीठ निर्माण झाले होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter