Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जिल्ह्यातील 453 गावातील कर्जमाफीला रेड सिग्नल

26-Sep-2017 : सांगली / प्रतिनिधी

जिल्ह्यातील 453 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे या गावांमधील कर्जमाफीअंतर्गत होणारे चावडीवाचन पुढील टप्प्यात घेण्याच्या सूचना सहकार विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे याठिकाणची कर्जमाफी आता निवडणुका होईपर्यंत रेंगाळण्याची चिन्हे आहेत.

कर्जमाफी योजनेसाठी मुदतीत जिल्ह्यातून वैयक्तिक 3 लाख 46 हजार अर्जाची नोंदणी झाली आहे. तर 1 लाख 88 हजार कुटुंबांनी अर्ज दाखल केले आहेत. आता सहकार विभागाकडून सोसायटीकडील कर्जखात्यांची लेखापरीक्षकांमार्फत पडताळणी सुरु आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत, त्या अर्जदारांची माहिती 2 ऑक्टोंबरपासून चावडी वाचन करून जनतेसमोर आणली जाणार आहे, मात्र आता यातील गावांसमोर आचारसंहितेची अडचण निर्माण झाली आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter