Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
गोपीचंद पडळकर यांचा आज आरेवाडीत दसरा मेळावा

26-Sep-2017 : विटा / प्रतिनिधी

आरेवाडी (ता.कवठेमहांकाळ) येथे आज-बुधवारी (दि.27) दसरा मेळाव्याच्या निमित्ताने लाखो बांधव बिरोबा बनात दाखल होतील. वैचारिक पातळीवर देवाण-घेवाण होणार असून अनेक विचारवंत व्यासपीठावरुन आपले विचार मांडणार आहेत, अशी माहिती दसरा मेळाव्याचे संयोजक युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी दै.जनप्रवास’शी बोलताना दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, आरेवाडी (ता.कवठेमहांकाळ) येथे दसरा मेळावा संपन्न होत आहे. हा दुसरा दसरा मेळावा असून या मेळाव्यासाठी लाखो बांधव बिरोबा बन येथे दाखल होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या मेळाव्यासाठी नामदार राम शिंदे, खासदार विकास महात्मे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार गणपतराव देशमुख, इंदापूरचे आमदार दत्ता भरणे, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, माजी आमदार प्रकाश शेंडगे, रमेश शेंडगे, समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter